img

बांधकाम विभाग, जिल्हा परिषद परभणी

img

कार्यकारी अभियंता(बा.) जिल्हा परिषद परभणी

दुरध्वनी क्रमांक २४५२ २४११९२
ई-मेल zpparbhani.ee@mahapwd.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा परिषद कार्यालय , जिंतुर रोड, परभणी
img

श्री ए. एल. शहाणे

कनिष्‍ठ प्रशासन अधिकारी , ( बांधकाम ) जिल्हा परिषद परभणी

दुरध्वनी क्रमांक २४५२ २४११९२
ई-मेल zpparbhani.ee@mahapwd.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा परिषद कार्यालय , जिंतुर रोड, परभणी

खात्याच्या योजना विषयी रचना, कामाचे स्वरुप व व्याप्ती

1. खात्याची रचना

मुख्य कार्यकारी अधिकारी

arrow

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

arrow

कार्यकारी अभियंता (बांध)

arrow

उप कार्यकारी अभियंता (बांध)

arrow
उप अभियंता (बांध) परभणी उप अभियंता (बांध) गंगाखेड उप अभियंता (बांध) पाथरी उप अभियंता (बांध) जिंतूर

2. कामाचे स्वरुप

 • रस्ते विकास आराखडा 2001-2021 नुसार ग्रामीण भागातील ग्रामीण मार्ग व ईतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्याची सुधारणा करणे
 • अस्तित्वातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, छोटया मो-या बांधणे, रस्त्याची किरकोळ व विशेष दुरुस्ती करणे
 • जिल्हा परिषद मालकीच्या ईमारतीची देखभाल व दुरुस्ती करणे
 • उप विभागाकडुन विविध योजनेची व विविध स्तरावरील कामे करुन घेणे
 • शासनाच्या विविध योजना शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राबविणे वा तांत्रिक मान्यता देणे
 • शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीच्या मर्यादेत खर्च करणे
 • विहित कालावधीत कामे पुर्ण करण्याची योग्य ती दक्षता घेणे
जिल्हा परिषदेत एकूण 9 तालुके असुन 4 उप विभाग आहेत
अ.क्र. उप विभागाचे नांव उप विभागातंर्गत असलेली तालुके
1. परभणी परभणी, पुर्णा
2. गंगाखेड गंगाखेड, पालम
3. पाथरी पाथरी, मानवत, सोनपेठ
4. जिंतूर जिंतूर, सेलू

वरील 9 तालुक्यामध्ये बांधकामास विभागाचे 4 उप विभाग आहेत. रस्ते विकास योजने अंतर्गत 9 तालुक्यामध्ये खालील प्रमाणे किमी. लांबीचे ईतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दर्जाचे रस्ते येतात.

अ.क्र. उप विभाग तालुका इजिमा ग्रामा एकूण
1. परभणी परभणी 169.00 477.23 646.23
2. पुर्णा 56.50 288.10 344.60
3. गंगाखेड गंगाखेड 72.20 340.33 412.53
4. पालम 98.30 254.40 352.70
5. पाथरी पाथरी 65.35 227.59 292.94
6. मानवत 57.00 206.20 263.20
7. सोनपेठ 76.70 130.30 207.00
8. जिंतूर जिंतूर 117.90 543.94 661.84
9. सेलू 27.50 347.70 375.20
एकूण 740.45 2815.79 3556.24

वरील रस्त्याची सुधारणा दुरुस्त्या व देखभाल करणेचा कार्यक्रम शासन व जिल्हा परिषद अनुदानातुन लोकप्रतिनिधीची मागणी, महत्वाचे एस.टी मार्ग नैसर्गिक आपत्तीने बाधा पोहचलेले रस्ते व दळणवळणासाठी सुस्थितीत ठेवण्याचे रस्ते व दळणवळणासाठी सुस्थितीत ठेवण्याचस प्राधान्यक्रम अवलंबुन असतो

3. खात्यामध्ये कार्यरत असणा-या विषयाची यादी

 • जिल्हा वार्षिक योजनातंर्गत रस्ते सुधारणा
 • गट अ
 • गट ब व क
 • गट ई
 • गट ड
 • 12 वा वित आयोग व
 • 13 वा वित्त आयोग शासन स्तर
 • पुनर्वसन विकास

अ.योजनातंर्गत कामे

जिल्हा वार्षि योजनातंर्गत ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे चे कामे हाती घेण्यता येतात. जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्या जिलहा परिषद गटातील कामे प्राधान्य क्रमांने घेण्यात येतात. व त्यास जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेण्यात येते

मंजूर नियतव्ययातुन दायित्व वजा जाता उर्वरित निधीच्या दिडपटीत कार्यक्रम तयार करुन मान्यतेनंतर उपलब्ध निधीच्यामर्यादेत कामे पुर्ण केली जातात.

ब. योजनेत्तर कामे

सदर योजनेत अस्तित्वातील रस्त्याची दुरुस्ती व परिरक्षणाची कामे हाती घेण्यात येतील रस्तयाची वाहतुक व दळणवळण सुस्थितीत ठेवण्यासाठी ग्राम विकास विभागाकडुन निधी उपलबध होतो. त्यानुसार अस्तित्वातील रस्त्याच्या पृष्ठभागानुसार देखभाल दुरुस्ती करुन दुरुस्ती करुन रस्ते दळणवळणासाठी सुस्थितीत ठेवण्यात येतात.

गट अ

रस्त्याच्या सर्वसाधारण दुरुस्तीमध्ये पृष्ठभाग निहाय रस्त्याचे खड्डे भरणे, पुलाचे कठडे दुरुस्त करणे भरावयाची दुरुस्ती रस्त्याच्या साईडपट्टया खचलेल्या दुरुस्त करणे रस्त्याच्या बाजुची झाडे झुडपे तोडणे रस्त्याच्या बाजुने गटर बांधणे खोदणे, अशा प्रकारची सर्वसाधारण दुरुस्ती केली जाते.

गट ब

रस्त्याची विशेष दुरुस्ती

सदर योजने अंतर्गत उपशिर्ष निहाय कामे घेतली जातात

ब-10 : रस्त्याची विशेष दुरुस्ती
ब-11 : डांबरी नुतनीकरण करणे
ब-14 : खडी नुतनीकरण करणे

विशेष दुरुस्तीमध्ये वरील प्रमाणे आवश्यकतेप्रमाणे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते.

गट क

क-21: पुल मो-यांची दुरुस्ती

ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यावरील पुल मो-यांची दुरुस्ती व देखभाल करणे

गट ई

पुरहानी अंतर्गत नैसर्गिक आपत्तीने क्षतिग्रस्त झालेले रस्ते व पुल मो-यांची दुरुस्ती करणे.

गट ड

वरील पैकी गट अ, ब, क व ई मध्ये समाविष्ठ नसणा-या कामाचा समावेश गट ड मध्ये करण्यात येतो. रस्त्यावर वाहतुक व दळणवळण संबधीचे दिशा दर्शक तत्सम फलक लावणे, किमी 200 मिटर अंतराचे दगडबसविणे, पुलावर स्टोन गार्ड बसविणे व वेग रोधक धावपट्टी (Speed Breaker ) बनविणे.

पुनर्वसन विकास

पुनर्वसनामुळे नवीन जागेत स्थलांतरीत झालेल्या गावासाठी मुलभुत सुविधा पुरविण्यात येतात.

4. रस्ते विकास योजना सन २००१-२०२१ नुसार परभणी जिल्हातील रस्ताची माहिती तालुकानिहाय नकाशा

परभणी जिल्हा parbhani
1 .परभणी तालुका pbn
2. पूर्णा तालुका purna
3. पालम तालुका palam
4. गंगाखेड तालुका gangakhed
5. सोनपेठ तालुका Sonpeth
6. पाथरी तालुका pathri
7. मानवत तालुका Manwat
8. सेलू तालुका Sailu
9. जिंतूर तालुका Jintur
Copyright © 2016 ह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क जिल्हा परिषद, परभणी कडे सुरक्षित आहेत