समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणी
श्री.शिवानंद मिनगीरे ( अ.पदभार )
समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद परभणी
|
दुरध्वनी क्रमांक |
०२४५२-२२०४८६ |
ई-मेल |
dswozpparbhani@gmail.com |
कार्यालयाचा पत्ता |
जिल्हा परिषद नूतन ईमारत , जवाहरलाल नेहरू रोड , स्टेशन रोड परभणी - 431 401 |
|
समाज कल्याण
अधिकारी व कर्मचारी माहिती
अधिकारी / कर्मचारी यांचे नाव |
हुददा |
भ्रमनध्वनी क्रमांक |
ई मेल आय डी |
जिल्हा समाज कल्याण अधिकारी |
जिल्हा समाज कल्याण अधिकारी |
|
dswozpparbhani@gmail.com |
श्री.पी. एस. भोसले |
सहाय्यक लेखाधिकारी |
|
|
श्री राठोड आर. आर. |
समाज कल्याण निरीक्षक |
7028732575 |
|
श्री वाघमारे जी.आर. |
समाज कल्याण निरीक्षक |
8177922339 |
|
श्री काळे आर पी. |
समाज कल्याण निरीक्षक |
9403949999 |
|
श्री मस्के व्ही. के. |
वरिष्ठ सहाय्यक |
7066744607 |
|
श्रीमती. जाधव ए. एस. |
कणीष्ठ सहाय्यक |
9421524007 |
|
श्री बल्लाळ यु. आय. |
वाहन चालक |
9405809155 |
|
श्री शिंदे व्ही. आर. |
सेवक |
|
|
श्री जोगे एस. एस. |
सेवक |
9860913085 |
|
श्रीमती अजीजा बेगम |
सेवीका |
|
|
समाज कल्याण विभागातील विविध योजना
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे
योजनेचे स्वरूप
दलित वस्त्यामध्ये मुलभूत सुविधा जसे- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा , सिमेंट रस्ते/ नाली बांधकाम , स्वच्छता विषयक सोयी , मलनिस्सारण , वीज , वस्तीला जोडणारे रस्ते , समाज मंदिर इ. व्यवस्था करुन दलित वस्तीची सर्वांगिण सुधारणा करण्यासंबंधी ही योजना आहे.
नियम, अटी व पात्रता इ
सदर काम मागासवर्गीय वस्ती मध्येच करणे आवश्यक . वस्तीचा बृहत आराखडा तयार करुन त्यानुसार तथा वस्तीच्या आवश्यकतेनुसार कामे घेण्यात येतात. लोकसंख्येच्या सुधारित निकषानुसार प्रत्येक दलित वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.
अ.क्र. | लोकसंख्या | अनुदान रक्कम (लाखात ) |
1 |
10 ते 25 |
2.00 लाख |
2 |
26 ते 50 |
5.00 लाख |
3 |
51 ते 100 |
8.00 लाख |
4 |
101 ते 150 |
12.00 लाख |
5 |
151 ते 300 |
15.00 लाख |
6 |
301 च्या पुढे |
20.00 लाख |
शाहु फुले आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियान
योजनेचे स्वरुप
राज्यातील दलित वस्त्यात राहण्या अनुसुचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे, दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता राहण्यासाठी तेथील रहिवाशांचा सहभाग वाढावा व सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी दलितांमध्ये प्रश्न सोडविण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्च केले , त्या शाहु फुले व आंबेडकर यांच्या नावाने सन 2006-07 पासून दलित वस्ती विकास व सुधारणा अभियान दरवर्षी संपुर्ण राज्याच्या ग्रामीण भागात राबविण्यात येते . या अभियांना अंतर्गत ज्या ग्रामपंचायतीं हिरीरीने सहभागी होवून उत्कृष्ट कार्य करतील अशा ग्रामपंचायतींना पूरस्कार प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात येतो
पारितोषिकांची रक्कम
अ.क्र. |
पुरस्कार स्वरुप |
पंचायत समिती स्तर |
जिल्हा स्तर |
महसुल विभाग स्तर |
राज्यस्तर |
1 |
प्रथम पुरस्कार |
25 हजार |
5 लाख |
प्रत्येक विभागातून प्रथम येणा-या दलित वस्ती पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीला 10 लाख रक्कम देण्यात येते |
25 लाख |
2 |
व्दितीय पुरस्कार |
15 हजार |
3 लाख |
15 लाख |
3 |
तृतीय पुरस्कार |
10 हजार |
2 लाख |
12.50 लाख |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने
योजनेचे स्वरुप
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकाचे उत्पन्न लक्षात न घेता सर्व पातळीवर शिक्षण फी परीक्षा फी इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षीक रु. 300/- प्रमाणे देण्यात येते. ज्याची प्रतिपुर्ती शाळांना करण्यात येते.
नियम , अटी व पात्रता इ.
विद्यार्थ्यी हा अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती आणि वि.जा.भ.ज. प्रवर्गातील असावा.
माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
योजनेचे स्वरुप
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्या त्या माध्यमिक शाळांमधील 5 वी ते 10 वीच्या प्रत्येक ईयत्तेमधून पहिला व दुसरा असे प्रत्येकी दोन विद्यार्थी याप्रमाणे ही शिष्यवृत्ती दिली जाते.
इ. 5 वी ते 7 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रतिमाह 50/- प्रमाणे 10 महिनेसाठी 500/-रु. व 8 वी ते 10 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रतिमाह 100/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1000/- रुपये दिली जाते.
नियम , अटी व पात्रता इ.
विद्यार्थी हा मागासवर्गीय अनु. जाती , अनु. जमाती , विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावा.
50 % पेक्षा जास्त गुण घेउुन ऊत्तीर्ण झालेला असावा.
खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांना शिक्षण शुल्क फी प्रतिपुर्ती
योजनेचे स्वरुप
खाजगी अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इ. 1 ली ते 10 वी च्या वर्गात शिक्षण घेणा-या दारिद्गय रेषेखालील कुटुंबातील अनु. जाती , विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.
- शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती संबंधीत शाळांना केली जाते , त्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.
- इ. 1 ते 4 थी प्रतिमाह 100/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1000/- रुपये
- इ. 5 ते 7 वी प्रतिमाह 150/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1500/-रुपये
- इ. 8 ते 10 वी प्रतिमाह 200/- प्रमाणे 10 महिनेसाठी 2000/-रुपये.
नियम , अटी व पात्रता इ.
विद्यार्थी हा दारिद्गयरेषेखालील कुटुंबांतील अनु. जाती , अनु, जमाती , विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावा.
अस्वच्छ व्यवसाय करणार्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती
योजनेचे स्वरुप
सदर योजनेत अस्वच्छ व्यवसायात काम करणार्याी पालकांच्या दोन अनिवासी पाल्यांना केंद्रस्तर 50 % रु. 925 व राज्यस्तर 50 % रु. 925 प्रमाणे 10 महिन्यांसाठी एकुण रु. 1850/- शिष्यवृत्ती दिली जाते. सदर शिष्यवत्ती इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणार्यात विद्यार्थ्यांना दिले जाते. तसेच निवासी पाल्यांना महिणा 700 प्रमाणे 10 महिन्यांसाठी एकुण रु. 7000/- व रु. 1000/- तदर्थ अनुदान एकुण 8000/- शिष्यवृत्ती दिली जाते. सदर शिष्यवत्ती इ. 3 ली ते 10 वी मध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना दिले जाते.
नियम , अटी व पात्रता इ.
या योजनेत मुलांचे पालक हे कातडी कमावणे , कातडी सोलणे , मैला सफाई करणे व कचरा कागद गोळा करणे यासारखे अस्वच्छ व्यवसाय करणे आवश्यक आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरुप
इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणार्याु अनु. जाती , विमुक्त जाती , भटक्या जमाती व इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणार्यास अनु. जातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उददेशाने अनुक्रमे सन 1996 व 2003 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
अ.क्र. |
इयत्ता |
शिष्यवृत्ती दर |
कालावधी |
1 |
5 वी ते 7 वी |
दरमहा रु. 60/-प्रमाणे रु. 600/- |
एकुण 10 महिने |
2 |
8 वी ते 10 वी |
दरमहा रु. 100/-प्रमाणे रु. 1000/- |
एकुण 10 महिने |
नियम , अटी व पात्रता इ.
1.उत्पन्न व गुणाची अट नाही.
2.संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक.
3. 75 % उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी. सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये /ऑनलाईन जमा करण्यात येते.
इ. 9 वी व 10 वी मध्ये शिकत असलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती
योजनेचे स्वरुप
अनु. जातींच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उदेश्याने केंद्र शासनाने दि. 1 जुलै 2012 पासून इ. 9 वी व 10 वी मध्ये शिकत असणार्याा अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपर्व शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे.
अ.क्र. |
योजना |
वसतिगृहात न राहणारे (अनिवासी) |
वसतिगृहात राहणारे (निवासी) |
1 |
शिष्यवृत्तीचे दर (प्रतिमहा) |
रु. 150/- |
रु. 350/- |
2 |
पुस्तके व अनुदान (वार्षिक) |
रु. 750/- |
रु. 1000/- |
नियम , अटी व पात्रता इ.
1. सदर योजना शासकीय मान्यताप्राप्त शाळेत शिकत असणार्या् विद्यार्थ्यांसाठी लागु राहील.
2. सदर योजने अंतर्गत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या पालकाची उत्पन्न मर्यादा रु 2.00 लक्ष इतकी असावी.
3. यामध्ये विद्यार्थ्यास किमान गुणाची अट नाही.
4. सदर योजनेतंर्गत विद्यार्थ्यांने अर्ज करणे आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ केंद्गाच्या इतर माध्यमिक पूर्व शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना लागु राहणार नाही.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनु. जातीच्या प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन
योजनेचे स्वरुप
अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना लागू आहे.
अनु. जातीच्या लाभधारक विद्यार्थ्यांना दरमहा रु. 100/- प्रमाणे 10 महिन्याला रु. 1000/- दिले जाते.
ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून रु. 40/- विद्यावेतन मिळते अशा विद्यार्थ्यांला सामाजिक न्याय विभागाकडून रु. 60/- प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येते
नियम , अटी व पात्रता इ.
सदर योजना शासकीय मान्यताप्राप्त शाळेत शिकत असणार्याव विद्यार्थ्यांसाठी लागु राहील.
विद्यार्थी हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित असावा व नियमितपणे हजर असावा
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन व अर्थसहाय्य
योजनेचे स्वरुप
समाजातील जातीयता नष्ट व्हावी म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. यामध्ये केंद्गस्तर 50 टक्के व राज्यस्तर 50 टक्के हिस्सा याप्रमाणे एकुण रु. 50000/- एवढे अर्थसहाय्य विवाहीत जोडप्यांना दिले जाते.
नियम , अटी व पात्रता इ.
या योजनेमध्ये एक व्यक्ती मागासवर्गीय तर दुसरी सवर्ण हिंदू , लिंगायत , जैन , शिख यामधील असावा. तसेच मागासवर्गीय अनु. जाती व जमाती , विजाभज यामधील आंतर प्रवर्गातील आंतरजातीय विवाहीतांनाही याचा लाभ दिला जातो.
मागासवर्गीय वसतिगृहांना परिपोषण अनुदान प्रदाने
योजनेचे स्वरुप
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुर्ण करता यावा , ग्रामीण भागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे , आर्थीक दुरावस्थेमुळे पालकांना मुलांच्या शिक्षणात अडचणी येउु नयेत व विद्यार्थ्यांचा शैक्षणीक विकास व्हावा या उददेशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
समाज कल्याण विभाग , जिल्हा परिषद , परभणी अंतर्गत एकुण 63 वस्तीगृहे कार्यरत असून एकुण 3040 विद्यार्थ्यांचे निवास/भोजनाचा विनामुल्य सोय केली जाते. यासाठी शासनामार्फत स्वयंसेवी संस्थांना प्रति विद्यार्थी रु 900 /- प्रमाणे अनुदाने दिले जाते व अधिक्षक यांना रु.8000/- , स्वयंपाकींना 6000/- , मदतनीस 5000 /-, पहारेकरी यांना रु. 5000/- असे प्रतिमहा मानधन अदा केले जाते. इमारत भाडयापोटी , सा.बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या 75 % अनुदान संस्थेस देण्यात येते.
नियम , अटी व पात्रता इ.
विद्यार्थ्यी मागासवर्गीय प्रवर्गातील असावा. (विहित टक्केवारी नुसार प्रवेश )
1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक.
विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
अपंग शाळा
परभणी जिल्हयामध्ये समाज कल्याण विभागातील एकुण 32 अनुदानित शाळा कार्यरत आहेत.
अ.क्र. |
शाळेचा प्रकार |
प्रवर्ग |
एकुण शाळा |
विद्यार्थी संख्या |
1 |
अनुदानित शाळा |
अस्थिव्यंग |
20 |
610 |
मुकबधिर |
06 |
370 |
मतिमंद |
06 |
170 |
एकुण |
32 |
1150 |
शालांत पूर्व शिक्षण घेण्यार्याण अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरुप
अपंगांना स्वतःच्या पायावर उभे राहुन स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतिशील घटक म्हणून जगता यावे यासाठी आवश्यक ते असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करुन घेण्यासाठी योग्य त्या अपंगांना राज्य शासन शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे.
चालु शैक्षणिक वर्ष 2014-15 पासून सदरील शिष्यवृत्तीचे दर खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. |
गट |
अनिवासी (दरमहा) |
1 |
गट- अ |
550 |
2 |
गट- ब |
530 |
3 |
गट- क |
530 |
4 |
गट- ड |
300 |
5 |
गट- इ |
230 |
त्याचबरोबर निर्वाह भत्ता ,सक्तीचे शुल्क , अभ्यासदौरा , वाचकभत्ता व प्रकल्प खर्च इ. देण्यात येतात.
नियम , अटी व पात्रता इ.
अपंग विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
अपंगत्वाची टक्केवारी 40 % व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बिजभांडवल योजना
योजनेचे स्वरुप
अपंगांना स्वतःच्या पायावर उभे राहुन स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतिशील घटक म्हणून जगता यावे यासाठी अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बिज भांडवल योजने अंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के एवढी रक्कम अनुदान व 80 टक्के एवढी रक्कम बँकेकडून कर्जरुपात देणे.
नियम , अटी व पात्रता इ.
वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 100000 /- व प्रकल्प खर्चाची मर्यादा रु. 150000/- आणि वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे.
अपंगत्वाची टक्केवारी 40 % व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
अपंग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना
योजनेचे स्वरुप
आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेंतर्गत अर्थसहाय्य ही योजना सुरु करण्यात आली आहे. अपंग व अव्यंग विवाहीतांना प्रोत्साहन देण्याची ही योजना किमान 40 % किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसणार्याा सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास सदर योजना लागू राहील.
नियम , अटी व पात्रता इ.
विवाहाच्या एका वर्षाच्या आतच या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येईल.
अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने , उपकरणे पुरविणे योजना
योजनेचे स्वरुप
अपंगांना स्वतःच्या पायावर उभे राहुन स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतिशील घटक म्हणून जगता यावे तसेच त्यांचे शारिरीक , मानसिक , सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांना कृत्रिम अवयव व साधने , उपकरणे पुरविणे ही योजना राबविली जाते
सदरील योजना ही स्वयंसेवी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविली जाते.
अनुसुचित जातीच्या मुलामुलींसाठी आश्रमशाळा योजना
योजनेचे स्वरुप
महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागा अंतर्गत 1996-97 पासून अनुसुचित जातीच्या मुलामुलींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत आश्रमशाळा राबवण्या बाबतचा निर्णय घेतला असून ज्या जिल्हयांमध्ये अनु. जाती व नवबौध्द यांचे प्रमाण जास्त आहे. त्या जिल्हयांमध्ये सदर योजना ही स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवली जात असून त्यापैकी परभणी जिल्हयात एकुण अनुसुचित जातीच्या दोन आश्रमशाळा असून त्या पुढीलप्रमाणे
- वसंत अनुसुचित जाती प्राथमिक आश्रमशाळा , कारेगांव
- वसंत अनुसुचित जाती माध्यमिक आश्रमशाळा , कारेगांव
प्राथमिक आश्रमशाळेत 140 निवासी विद्यार्थ्याना मान्याता असून माध्यमिक शाळेत 120 निवासी विद्यार्थ्यी मान्यता आहे.
शासनाने ठरवलेल्या आकृतीबंधानुसार कर्मचार्यां ची पदे भरलेली आहेत.
आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची व्यवस्था , मोफत शैक्षणिक साहित्य , आरोग्यविषयक सेवा , अंथरुण-पांघरुण तसेच वर्षाकाठी गणवेशाचे दोन संच इ. पुरवले जाते.
सदर खर्चाबाबत शासनाकडुन स्वयंसेवी संस्थांना प्रती विद्यार्थी रु. 900 परिपोषण अनुदान दिले जाते. तसेच एकुण इमारत भाडयाच्या 75% इमारत भाडे दिले जाते
नियम , अटी व पात्रता इ.
- प्रत्येक वर्गात मान्य निवासी संख्येपैकी 2 % विद्यार्थी हे अनुसुचित जमाती व विजाभज या प्रवर्गातील असतील.
- 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल
- आश्रमशाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.